भंडारा : वरठी येथील हनुमान वार्ड परिसरातील बंद घरात महिलेचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याची घटना बुधवारी, २१ जून रोजी सायकाळी ७ वाजता उघडकीस आली. येणू कंटीराम बालपांडे, वय ५५ असे मृत महिलेचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घराला कुलूप दिसल्याने मुलाने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याच्या आईचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. घटनेची माहिती वरठी पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत येणू बालपांडे यांच्या शरीरावर रॉडने तीन ठिकाणी वार केल्याचे दिसून आल्याने व कंटीराम हे सकाळपासूनच घरून बेपत्ता असून नेमके घडले तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – वृत्तपत्र व्यवसायातील कष्टकऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळ का नाही? विक्रेता संघटनेचा सवाल

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dead body of a woman was found in a closed house in hanuman ward area of varathi ksn 82 ssb