The forest department succeeded in catching the tiger that killed four people in Nagbhid taluka chandrapur | Loksatta

चंद्रपूर: दीड महिन्यात चार जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद

याच आठवड्यात या वाघाने ढोरपा येथील महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते.

चंद्रपूर: दीड महिन्यात चार जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद
चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यात दीड महिन्यात चार जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला पकडण्यत वनविभागाला यश

गेल्या दीड महिन्यात नागभीड तालुक्यातील ढोरपा, पाहर्णी, पान्होडी या गावातील चार जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला आज, शनिवारी अखेर जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. वन विभागाने या वाघाला बेशुद्ध करून पकडले.

हेही वाचा- धक्कादायक! नागपूरमध्ये चॉकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा; चॉकलेट देणाऱ्या आरोपीचा शोध सुरु

नागभीड तालुक्यात सतत वाघाचे हल्ले सुरू आहेत. परिसरात या वाघाच्या हल्ल्याच्या दीड महिन्यात चार घटना घडल्या. वनिता वासुदेव कुंभरे (पाहर्णी) ही महिला शनिवारी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर ढोरपाजवळ असलेल्या टेकरी या शिवारात याच वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली होती, तर याच आठवड्यात वाघाने ढोरपा येथील महिलेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्या अगोदर पान्होडी येथील गुराख्यास वाघाने ठार केले होते. त्यामुळे या परिसरांत वाघाची दहशत पसरली होती. आज वनविभागाने त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 19:06 IST
Next Story
राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य