Premium

चंद्रपूर : नागरिकांना हादरवून सोडणारा बिबट अखेर जेरबंद

गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव व परिसरात आठवडाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

leopard roaming around Vejgaon caught
चंद्रपूर : नागरिकांना हादरवून सोडणारा बिबट अखेर जेरबंद (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव व परिसरात आठवडाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. शुक्रवारी सकाळी त्याला सापळा लाऊन पकडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

हेही वाचा – भंडारा : अवकाळीग्रस्तांच्या भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार… राज्यपालांची ग्वाही

गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने गावात प्रवेश करून पाळीव जनावरांना आपले भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे गावातील नागरिक घाबरले होते. या भीतीपोटी ग्रामस्थांनी घराबाहेर पडणे तसेच शेतकऱ्यांनी शेतात जाणेसुद्धा बंद केले. मात्र, वनविभागाने घटनेची गंभीरता लक्षात घेता रात्रीची गस्त वाढवीत बिबट्याच्या गावात ये-जा करण्याच्या मार्गावर ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावला होता. सकाळच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आले. वेजगाव जंगलालगत असल्यामुळे अशा घटनेत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे..

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The leopard which has been roaming around vejgaon and its surroundings for a week was caught in a cage rsj 74 ssb

First published on: 08-12-2023 at 18:38 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा