गडचिरोली : दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना पुरातून चारचाकी नेण्याचे धाडस अंगलट आले. वाहनातून वेळीच उड्या मारल्याने दोन अभियांत्यासह चालक थोडक्यात बचावला. सदर घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एटापल्लीजवळील बांडे नदीच्या पुलावरुन पाणी वाहात होते.

हेही वाचा >>>बुलढाणा: मलकापुरात निसर्ग कोपला! ‘कोसळधार’मुळे शेती पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी

पण चालकाने पुढे काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गाडी पाण्याच्या प्रवाहाने सरकू लागली. त्यामुळे गाडीमधील अभियंत्यांसह चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उड्या घेतल्या. थोड्याच वेळात त्यांची गाडी पाण्याच्या प्रवाहाने पुलावरून खाली कोसळत वाहात गेली. असे धाडस कोणीही करुन आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.