अमरावती कारागृहातून तीन कैदी पळाले

येथील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून तीन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

( संग्रहित छायचित्र )

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून तीन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

साहिल अजमत कळसेकर (३३ रा. रत्नागिरी), सुमीत शिवराम धुर्वे (२२), रोशन गंगाराम उइके (२३), दोघेही रा. शेंदूरजनाघाट, अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या तिन्ही कैद्यांना मध्यवर्ती कारागृहातील बरॅक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात आले होते. सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन हे कैदी बरॅक आणि तुरुंगाची भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरले.

साहिल कळसेकर हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता, तर सुमीत धुर्वे आणि रोशन उईके हे बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेले कैदी आहेत. या कैद्यांनी तुरुंगाची भिंत कशी ओलांडली, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांनी फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three prisoners escaped from amravati jail amy

Next Story
पालकमंत्र्यांच्या पहिल्याच ‘लोकसंवादा’तील तक्रारी प्रलंबित ; जिल्हाधिकारी कार्यालय, सुधार प्रन्यासची प्रकरणे अधिक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी