वाशीम : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियान मधून अचानक यवतमाळ वाशीम लोकसभेचा कार्यकर्ता मेळावा रद्द केल्याने लोकसभेची जागा भाजपच्या पारड्यात तर गेली नाही ना? यावरून शंका व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र; भावना गवळी यांच्या ऐवजी महायुतीकडुन एका बड्या नेत्याच्या नावाची चर्चा !

खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेबाबत २९ डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस दिली होती. आयकर विभागाने पाच जानेवारीपर्यंत भावना गवळी यांना उत्तर मागितले होते. मात्र भावना गवळी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिल्याने आयकर विभागाचे समाधान झाले नसल्याने आयकर विभागाने अखेर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसंकल्प अभियान आधी ६ जानेवारी रोजी यवतमाळ वाशीम येथून होणार होते. त्यात बदल करून २० जानेवारी रोजी सुधारित दौरा आयोजित करण्यात आला होता. परंतू तिसऱ्या दौऱ्यात वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा रद्द करण्यात आला आहे. या घडामोडी मुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशीम लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला गेली तर नाही ना? यावरून चर्चा रंगत आहे. ही जागा शिंदे गटाकडे राहणार? की भाजप कडे गेल्यास त्यांच्याकडून कुणाला मैदानात उतरविणार या बाबत मतदार संघात उत्सुकता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Washim yavatmal mp bhavana gawali institutions account seized by income tax department pbk 85 css