नागपूर :  पाण्याचे स्रोत प्रदूषित होत असल्यामुळे शुद्ध जल मिळणे कठीण होत आहे, त्यामुळे जलसाठे संरक्षित करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असा सूर जलतज्ज्ञांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलसंपदा विभाग, भारतीय जलसंसाधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताह पार पडला. यावेळी आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, निरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे, जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकूर देसाई, जिल्हा समन्वयक पदमाकर पाटील, बानाईचे अध्यक्ष अरविंद गेडाम उपस्थित होते.

हेही वाचा – चंद्रपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २८ मार्चला दिल्ली येथे निदर्शने

हेही वाचा – बुलढाणा: भांडण सोडविणे बेतले जीवावर, बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

रवींद्र ठाकरे म्हणाले, पाणी प्रदूषणामुळे पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व प्रजातीसुद्धा नष्ट होत आहेत. त्यासाठी शुद्ध पाणी कसे टिकवून ठेवता येईल, यावर चिंतन होणे गरजेचे आहे. आजच्या काळात नदी प्रदूषण हा मोठा विषय आहे.

विदर्भातील नद्यांचे प्रदूषण थाबविण्यासाठी निरीतर्फे सहकार्य करण्यात येईल, असे डॉ. अतुल वैद्य, यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water awareness week organized in association with department of water resources indian water resources institute was held cwb 76 ssb