नागपूर : छत्रपती शिवरायांचे कार्य चिरकाल टिकणारे असून ते आमच्यासाठी आदर्श असल्याचे मत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्या निमित्त महालमध्ये आयोजित कार्यक्रमात भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला. यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : धक्कादायक! चक्क कैदी आणि पोलिसाने केली पार्टी..

यावेळी विक्रमसिंह मोहिते उपस्थित होते. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच नागपुरातील ३० ढोलताशा पथकांनी एकत्रित वादन सादर करीत शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. यावेळी तरुणाई पारंपारिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What did mohan bhagwat of rss say at shiv rajyabhishek ceremony in nagpur vmb 67 ssb