नागपूर : पश्चिम नागपुरातील भाजपा नेत्या सना खान यांचा मृतदेह आठ दिवसांनंतरही जबलपूर पोलिसांना सापडला नाही. जबलपूर पोलिसांनी मृतदेहाचा नव्याने शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक गठित केले आहे. हिरन नदीच्या काठावरून पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जबलपूरमधील कुख्यात गुंड अमित ऊर्फ पप्पू शाहू याने भारतीय जनता पक्षाची महिला नेता सना खान हिचा खून केला. सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकून पुरावा नष्ट केला. हत्याकांडाला आठ दिवसांचा कालावधी झाल्यानंतरही पोलिसांना सना खान यांचा मृतदेह सापडला नाही. सना यांचा मृतदेह मिळून न आल्यामुळे नागपूर आणि जबलपूर पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा – यवतमाळ: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

जबलपूरमधील गुंड अमित शाहू या वाळू तस्कर आणि दारू माफियाने सना खान हिच्याशी एप्रिल महिन्यात लग्न केले होते. विवाहित असलेल्या अमितची पत्नी मध्यप्रदेश पोलीस दलात नोकरीवर आहे. त्याच्या पत्नीला सनाशी असलेल्या पतीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाली. त्यामुळे दोघांत वाद झाले होते. पती-पत्नीने एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. २ ऑगस्टला अमितचा सना खानशी वाद झाला. त्या वादातून अमितने सना खानचा खून केला. तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून हिरन नदीत फेकून दिला. घरी परत आल्यानंतर जीतेंद्र गौड या नोकराला कारची डिक्की स्वच्छ करण्यास सांगितले.

हेही वाचा – हवा प्रदूषणाविरोधातील लढ्यासाठी ‘इंडिया क्लिन एअर कनेक्ट प्लॅटफॉर्म’, जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांपैकी जवळपास ७० टक्के शहरे भारतात

कारमधील सना खानच्या रक्ताचा सडा जीतेंद्रला दिसला होता. मात्र, त्याने मालकाच्या सांगण्यावरून रक्ताचे डाग पुसल्याची कबुली जबलपूर पोलिसांना दिली. सनाच्या खुनामागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. अमित शाहू अद्याप फरार आहे. त्याचा शोधही पोलीस घेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the exact reason behind the murder of bjp leader sana khan a new search for the body is underway adk 83 ssb