गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादात पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केली असून हा वाद शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसच्याच काही गटातून विरोध होतो आहे. यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात काँग्रेसच्या काही नेत्यांनी पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद काढून ते आदिवासी नेत्याकडे सोपवावे, अशी मागणी केली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजीनाट्याला नवे वळण मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- बच्चू कडू यांचे पुढील लक्ष्य नागपूर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी पक्ष निरीक्षक रमेश चेन्निथला यांना विविध बाबी सांगितल्या. त्यात आजवर अल्पसंख्याक, दलित समाजाच्या नेत्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळाली, मात्र आदिवासी नेता महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाला नाही. राज्यात या घटकाचे 25 आमदार आहेत. त्यात काँग्रेसचे केवळ चार आमदार असून उर्वरित प्रामुख्याने भाजप व अन्य पक्षाचे आहेत. काँग्रेसला मानणारा हा वर्ग दूर का गेला याचा विचार करावा, अशी विनंती डॉ. नामदेव उसेंडी, माजी खासदार उत्तमराव पवार तसेच रणजित देशमुख गटाचे खान नायडू व इक्रम हुसेन यांनी करीत ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे नाव सुचविले.

हेही वाचा- गोंदिया : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार प्रफुल पटेल यांचा पाठिंबा

शिवाय सुनील केदार व नितीन राऊत यांचेही नाव त्यांच्या समर्थकांनी पुढे केल्याची माहिती आहे. माजी मंत्री सतेज पाटील यांचेही नाव चर्चेत असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. इतर ज्येष्ठ नेत्यांनी कोणतेही नाव न सुचविता प्रथम ‘पटोले हटाव ‘ला प्राधान्य दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the tribal leader not yet the state president of the congress ask ramesh chennithala pmd 64 dpj