भंडारा : एका तरुणाने घरासमोर राहणाऱ्या विवाहित महिलेला तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठविले. हे मेसेज विवाहितेच्या पतीने पाहिले. या कारणावरून भंडाऱ्याच्या जैतपूर बारव्हा गावात थरारक हत्याकांड घडले आहे. एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणांने विवाहित महिलेला तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठविलेत. हे मॅसेज आणि फोटो विवाहित महिलेच्या पतीनं बघितले आणि त्याचा राग अनावर झाला. तो सोपान खोब्रागडे (वय ३५ वर्ष) हा घराशेजारी राहणारा तरुण मोहीत घटारे याला हे मॅसेज आणि फोटो का पाठविलेत, असं विचारायला गेला. मात्र, मोहित हा घरी नसल्याने त्याची आई सुनाबाई घटारे (वय ४५ वर्ष) याच्याशी सोपानचा वाद झाला.हा वाद विकोपाला गेल्याने सोपान खोब्रागडे यानं तरुणाची आई सुनाबाई यांना लाठीकाठीनं बेदम मारहाण केली.

दरम्यान, या मारहाणीत अती रक्तस्त्रावामुळं उपचारादरम्यान महिलेचा लाखांदूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही थरारक घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतपूर बारव्हा या गावात घडली. घटनेनंतर सोपान खोब्रागडे यांनं दिघोरी मोठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र २९ मे रोजी सायंकाळी घडलेल्या या थरारक घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.