भंडारा : एक महिला पान टपरीवर विश्रांती घेत होती. मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण तेथे आला आणि तिला दारूची मागणी करू लागला. महिलेले दारू नाही असे सांगताच तरुणाने रागाच्या भरात तिच्यावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यात ही महिला गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसरच्या सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या चंद्रिकापुरे यांच्या पानठेल्यावर फिर्यादी महिला (५६) रात्री विश्रांती घेत होत्या. १२.३० वाजताच्या सुमारास अविनाश दिलीप भोंडे (१८) रा. शिवाजी नगर, तुमसर हा तरुण तेथे आला. त्याने फिर्यादी महिलेला दारूची मागणी केली. मात्र महिलेने दारू नसल्याचे सांगितले. रागाच्या भरात या तरुणाने चाकूने महिलेवर वार करून तिला जखमी केले.
First published on: 06-04-2025 at 18:14 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man stabs woman for not giving alcohol ksn 82 zws