लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पदवीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी एका युवकाशी सूत जुळले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत प्रेमविवाहाचे स्वप्न रंगवले. त्याला भावी पती मानून सर्वस्व अर्पण केले. मात्र, तो युवक दोन मुलांचा बाप निघाला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपककुमार बिजेंद्र मुखीया (२३, रा. एमआयडीसी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित २३ वर्षीय तरुणी सोनिया (काल्पनिक नाव) ही बी. कॉमच्या अंतीम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिच्या आईची अमरनगरात चहाचे दुकान आहे. तेथे आईला मदत करण्यासाठी सोनिया दुकानावर जात होती. तेथेच ती अभ्याससुद्धा करीत होती. गेल्या वर्षभरापूर्वी चहा घ्यायला दीपककुमार आला. त्यावेळी सोनिया दुकानात होती. त्याने चहा घेताना नागपुरात नवीन असल्याचे सांगून सहानुभूती मिळवली. त्यानंतर तो दररोज चहा घेण्यासाठी आला. तो ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. दोघांची ओळखी वाढली. त्यानंतर तिच्या आईशीही त्याने सलगी वाढवली.

आणखी वाचा-नागपूर : शेकोटी पेटवल्यामुळे घराला आग, दोन भावडांचा होरपळून मृत्यू

चोरून-लपून भेटणारा दीपक आता बिनधास्तपणे चहाच्या दुकानावर सोनियाला भेटायला येऊ लागला. दोघांचे सूत जुळले. प्रेमसंबंध वाढल्यानंतर दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. सोनियाने आपल्या आईशी भेट घालून लग्न करण्याचा निर्णय सांगितला. आईनेही दोघांना लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर सोनियाच्या घरी जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला लागला. तिला वारंवार बाहेरगावी फिरायला न्यायाला लागला. भावी पती म्हणून सोनियासुद्धा त्याला विरोध करीत नव्हती. दोघांचेही संबंध घट्ट झाले आणि लग्नापर्यंत निर्णय ठाम झाला.

आणखी वाचा-चंद्रपूर : महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ‘प्रशासक राज’ आमदारांसाठी डोकेदुखी!

वडिलांना कँसर झाल्याचा बनाव

दीपककुमार हा मूळचा बिहारचा असून त्याने वडिलांना कँसर झाल्याचे सोनियाला सांगितले. वडिलांचे ऑपरेशन करण्यासाठी खूप पैसा लागणार असल्याची थाप त्याने सोनियाला दिली. त्यामुळे होणाऱ्या सासऱ्याच्या कँसरवरील उपचारासाठी चक्क अडीच लाख रुपये सोनियाने दीपकला दिले. पैसे मिळाल्यानंतर दीपक वारंवार तिला टाळत होता. लग्नाचा विषय काढला की उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने सोनियाला संशय आला.

प्रियकर निघाला विवाहित

पैसे घेतल्यानंतर प्रियकराचे पूर्वीप्रमाणे प्रेम नसल्याचे सोनियाला जाणवत होते. तो तिला कुटुंबियांशी भेट करून देण्यासाठी घरी नेण्यास नकार देत होता. त्यामुळे सोनियाने त्याच्या मित्राकडे चौकशी केली. दीपक हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे एका मित्राने तिला सांगितले. तिच्या पायाखालची जमीन सरकली. प्रेमात दगा दिल्याने चिडलेल्या सोनियाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. यादरम्यान प्रियकर फरार झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young women file rape case against boyfriend as she know about he is married and father of two children adk 83 mrj