बुलढाणा: विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले आणि वाढत्या गुन्हेगारीने अधून मधून गाजत असलेले मलकापूर शहर आणि तालुका काल बुधवारी रात्री झालेल्या निर्घृण हत्येने हादरले! नाममात्र कारणावरून एका सशस्त्र टोळक्याने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात हा जागीच युवक ठार झाला असून त्याच्या सोबतचा मित्र नशीब बलवत्तर म्हणून बचावला. प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या मलकापूर नजीकच्या धुपेश्वर परिसरात हा रक्त रंजित थरार घडला. याप्रकरणी दसरखेड एमआयडीसी (मलकापूर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी दसरखेड पोलिसांनी काल बुधवारी रात्री उशिरा चार युवकांना अटक केली आहे. जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
मलकापूर तालुक्यातील प धुपेश्वर येथील पुलावर ही खळबळजनक घटना घडली. यात कमिअधिक १२ जनांच्या टोळीने शेतकऱ्यांच्या मुलांवर धारदार शस्त्राने (चाकु) ने वार केले. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला. सतीश गजानन झाल्टे असे मृताचे नाव असून अविनाश जितेंद्र झाल्टे असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. या हत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी घटनेआधी कुरा येथे हे दोन युवक आणि बेधुंद टोळीत किरकोळ कारणावरून वाद झाला. नंतर धोपेश्वर येथे येत असताना पुलावरच टोळीने दोघांना गाठले. सतिशच्या पोटात धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आल्यानंब तो जागीच गतप्राण.या हल्ल्यात अविनाश सुदैवाने बचावला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या गावाकऱ्यांनी अविनाश ला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
चौघे जेरबंद
या प्रकरणी दसरखेड पोलिसांनी तपास चक्र फिरवून चार आरोपीना तत्काळ जेरबंद केले . देवा ठाकुर, संकेत पालवे, सौरभ पालवे, अरविंद उर्फ गब्बर सोळंके अशी आरोपीची नावे असून ते सर्व विशितील आहे. आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. जखमी अविनाश जितेंद्र झालटे याला गंभीर दुखापत झाल्याने आधी मुक्ताईनगर व नंतर जळगाव ( खान्देश ) येथे उपचारासाठी जळगाव हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरोपीना वैद्यकीय तपासणीसाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले . या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत युवकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते. या ठिकाणी ठाणेदार गिरी, कोळी यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त लावण्यात आला होता.ताफा तैनात करण्यात आला होता. दसरखेड ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे . मात्र खुनाचे नेमके कारण समजु शकले नाही.