यासंदर्भात निफाड येथे बाजार समिती सभागृहात माजी आमदार अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी शिवसेनेवर अनेक संकटे आली. परंतु, त्यातून तावून सुलाखून शिवसेना निघाली असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यातून तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
उद्धव ठाकरे २६ मार्चला मालेगाव येथे येत असून त्या सभेला सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दिंडे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, महिला आघाडीच्या भारती जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, तालुकाप्रमुख सुधीर कराड, जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, आशिष शिंदे, रमेश जेऊघाले, संजय धारराव, संजय कुंदे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख दराडे, कराड, खंडू बोडके, भारती जाधव यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस बाळासाहेब पावशे, बाबाजी कुशारे, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, अश्पाक शेख आदी उपस्थित होते.