नाशिक – मालेगाव तालुक्यातील दहिवाळ गावात झालेल्या पाच घरफोडींमध्ये १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास झाला. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथील योगेश कदम यांच्या घरातून दोघांनी ५० हजार रुपये रोख, ६० हजार रुपयांची सोन्याची पोत, तीन हजार रुपयांचे चांदीचे कडे असा एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गणेश मते यांच्या घरातून एक लाख, ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या, दीड हजार रुपयांचे चांदीचे दागिने, १५ हजार रुपये रोख असा एक लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. शिवसिंग पवार यांच्या घरातून एक लाख ४० हजार रुपयांची सोन्याची गोळी, एक लाख २० हजार रुपयांची सोन्याची पोत, ८० हजार रुपयांचे सोन्याचे कानातील दागिने, ८० हजार रुपयांची सोन्याची पोत, ६० हजाराची सोन्याची अंगठी, एक लाख रुपये, असा सहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

हेही वाचा – धुळे : तरुणाकडून गावठी बंदुकीसह काडतुसे जप्त

भाऊसाहेब नेरकर यांच्या घरातून ८० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजाराची सोन्याची अंगठी, २० हजाराचे सोन्याचे कानातील दागिने, ६० हजाराचे चांदीचे कडे, ६० हजार रुपये रोख असा दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रंजित नरवाड यांच्या घरातूनही दागिने, रोख रक्कम चोरण्यात आले. एकूण पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीत १५ लाख, ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.