नाशिक : येवला तालुक्यातील देशमाने येथे नाशिक- छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पुलावर खासगी आराम बस आणि मालवाहतूक वाहन यांच्यात झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू तर, सात प्रवासी जखमी झाले.

जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांची खासगी आराम बस येवला तालुक्यातील देशमाने येथे आली असता मालवाहू वाहनाला धडक बसून ती शेतात शिरली. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले.

हेही वाचा…त्र्यंबकेश्वरमध्ये तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू

खाजगी बसमध्ये ६० प्रवासी होते. जखमींना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येवला तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.