नाशिक : माजी महापौर दशरथ पाटील यांचे फेसबुक खाते हॅक करण्यात आले आहे. खोडसाळपणा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. याबाबत सायबर गुन्हे शाखेला पत्र देण्यात आले आहे. दशरथ पाटील माजी महापौर असून राजकीय वर्तुळात ते सक्रिय आहेत. सद्यस्थितीत फेसबुकवर दशरथ धर्माजी पाटील या नावाने दोन खाती आहेत. या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्याचा, त्या त्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच नागरिकांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते, असे त्यांचे म्हणणे आहे. १० जुलै रोजी हॅकरने दशरथ धर्माजी पाटील या नावाचे दुसरे फेसबुक खाते हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर १९ जुलै रोजी पाटील यांनी स्वत: खाते वापरण्याचा प्रयत्न केला असता ते करता आले नाही. हे खाते हॅक झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. अशी कृती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mayor dashrath patil facebook account has been hacked ysh