जळगाव: रावेर तालुक्यातील सावदा येथील पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षकासह उपनिरीक्षकाला अपहार प्रकरणातील संशयितांना अटक न करण्यासाठी लाच मागणे चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारणारा सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाला रंगेहात अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जळगाव: “मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर मला…” सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला

हेही वाचा >>> नाशिक: तालुकानिहाय मोठ्या थकबाकीदारांच्या नावांना आता प्रसिध्दी; जिल्हा बँकेच्या थकीत कर्ज वसुलीला अल्प प्रतिसाद

सावदा शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयिताला अटक न करण्यासाठी पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक देविदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याअनुषंगाने विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी पथक नियुक्त केले. पथकाने सापळा रचत इंगोले आणि गायकवाड यांना अटक केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon two police officers arrested in bribery case crime news ysh