नाशिक : अभिनेत्री अनिता दाते, दिग्दर्शक सचिन शिंदे, रंगकर्मी कार्यकर्ता राजेश जाधव यांच्यासह १२ जणांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महेश डोकफोडे यांना रंगतपस्या पुरस्कार जाहीर झाला आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : द्वारकाधीश कारखान्यास पाच लाख टन ऊस मिळाल्यास तीन हजार रुपयांचा भाव

नाट्य परिषदेच्या वतीने रंगकर्मींचा सन्मान करण्यासाठी रंगभूमी दिनानिमित्त रंगकर्मी पुरस्कार दिले जातात. यंदाचा पुरस्कार सोहळा ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, पालकमंत्री दादा भुसे, मनपा आयुक्त डॉ. विजय करंजकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कार सोहळ्यात दत्ता भट स्मृती पुरस्काराने सुनील ढगे, शांता जोग स्मृती पुरस्काराने अभिनेत्री अनिता दाते, प्रभाकर पाटण स्मृती पुरस्काराने दिग्दर्शक सचिन शिंदे, नेताजीदादा स्मृती पुरस्कार लेखक रवींद्र कटारे, वा. श्री. पुरोहित स्मृती बालरंगभूमीसाठी पुरस्कार प्रा. विजय कुमावत, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्काराने पीयुष नाशिककर, डॉ. रामदास बरकले स्मृती पुरस्काराने श्रीकांत गायकवाड, गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्काराने लोकशाहिरीसाठी शाहीर शंकर जाधव, विजय तिडके स्मृती पुरस्काराने रंगकर्मी कायकर्ता म्हणून राजेश जाधव, सुमन चाटे स्मृती पुरस्काराने पार्श्वसंगीतासाठी आनंद ओक, गिरीधर मोरे स्मृती पुरस्काराने प्रफुल्ल दीक्षित यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रुपये दोन हजार, सन्मानपत्र असे आहे.

हेही वाचा : ‘संजय पवार यांचा राजीनामा निव्वळ नाटक’, संचालक मंडळाचा आरोप

रंगतपस्या पुरस्काराने महेश डोकफोडे यांना गौरवण्यात येणार असून रुपये ११ हजार, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच विशेष योगदानासाठी डॉ. शेफाली भुजबळ (शैक्षणिक), प्रशांत खरोटे (छायाचित्रकार), अमित कुलकर्णी (सांस्कृतिक), भाग्यश्री काळे (नाट्य कारकिर्द) यांना गौरवण्यात येईल. नाशिककरांनी सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik branch of all india marathi drama council declared award to mahesh dokfode css