नाशिक : सिडकोतील तोरणा नगर परिसरात प्रार्थनास्थळावरून दोन गटात काही काळ वाद निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला. संबंधित ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडकोतील तोरणा नगरात मटण बाजाराजवळील एका घरात प्रार्थना शिकवण्याचे वर्ग घेतले जातात. प्रारंभी ही संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. परंतु, काही महिन्यांमध्ये संख्येत वाढ झाली आहे. प्रार्थनेसाठी येणाऱ्यांची वाहने अस्ताव्यस्तपणे रस्त्यावरच उभी करण्यात येत असल्याने इतरांची अडवणूक होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी दुपारी प्रार्थनेवेळी गर्दी जास्त झाली. त्यावेळी काही जणांनी रस्त्यावरच प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केल्याने स्थानिकांनी आक्षेप घेतला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जमाव जमल्याने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांशी संवाद साधत समजुतीची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police intervention in dispute of two groups at a religious place in cidco area css