नाशिक – कुंभनगरी नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले. आणि शहर पोलिसांनी राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणाऱ्यांची गठडी वळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्ब्ध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर ते चक्क पोपटासारखे बोलू लागले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, असे ते म्हणू लागले. शुक्रवारी हाच कित्ता भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या मामा राजवाडेने गिरवला. मामाही बोलू लागला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…
सर्वबाजूने टीका झाल्यानंतर जाग आलेल्या नाशिक पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांविरुध्द कारवाईला सुरुवात केली आहे. कोणीही उठतो, हातात कोयता, चाकू, कोयता घेतो. रस्त्यात, चौकात साथीदारांसह एखाद्याची मुद्दामहून कळ काढली जाते. पैशांची मागणी केली जाते. विरोध झाल्यास हल्ला केला जातो. एखाद्या दुकानात शिरुन हप्ता मागितला जातो. प्रतिकार केल्यास भोसकले जाते. अबड, सातपूर या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते. जोडीला टोळ्यांमधील आपआपसातील वादातून हाणामाऱ्या यामुळे नाशिककर वैतागले होते. आता नाशिककरांची या त्रासातूून सुटकेसाठी नाशिक पोलिसांनी कारवाई प्रारंभ केली आहे.
सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी याआधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पुत्र भूषण लोंढे यासह त्याच्या टोळीतील काही जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची मूळे अधिक खोलवर गेल्याने पोलिसांनी थेट रिपाइंचा ज्येष्ठ नगरसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रकाश लोंढे यालाच उचलले. प्रकाश लोंढे हा बाॅस म्हणून ओळखला जातो.
बाॅस, नानानंतर मामाही वठणीवर…म्हणू लागले, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…
— LoksattaLive (@LoksattaLive) October 10, 2025
कुंभनगरी नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले. आणि शहर पोलिसांनी राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणाऱ्यांची गठडी… pic.twitter.com/RDB1mhYCP1
तसेच त्याच्या दीपक लोंढे उर्फ नाना या मुलालाही ताब्यात घेतले. लोंढे पिता-पुत्रांची टोळी सातपूर, अंबड परिसरात पी. एल. गँग म्हणून ओळखली जाते. हा परिसर औद्योगिक कंपन्यांचा आहे. रात्री कामावर जाणाऱ्या तसेच कामावरुन परतणाऱ्यांना गाठून, त्यांना धमकावत पैसे हिसकावून घेण्याचा उद्योग या टोळीतील गुंड करीत असल्याची अनेकांची तक्रार आहे. याशिवाय अपहरण, हत्येची धमकी असे प्रकारही या टोळीकडून झाले आहेत.
हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी अटक केलेल्या प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांना न्यायालयात नेतांना नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले. त्यानंतर अजून एका प्रकरणात पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांच्याबरोबर भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या मामा राजवाडेला अटक केली. त्यास शुक्रवारी न्यायालयात नेतांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले. मामाही मोठ्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून वाट चालत होता.