माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकाविला असून, खडसे समर्थक पॅनल विजयी झाले आहे.निवडणुकीत सतरापैकी तेरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आल्या आहेत. यामुळे भाजप-शिंदे गटाला हा धक्का मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>जळगाव: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा विजय; मात्र पॅनलचा पराभव

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. अध्यक्षपदी भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण बिनविरोध झाले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कुर्‍हा येथे भाजपचे आमदार चव्हाण यांनी सभा घेत खडसेंवर हल्लाबोल केला होता. या ग्रामपंचायतीत चुरस होती. खडसे समर्थक पॅनलचे सतरापैकी तेरा उमेदवार विजयी झाले. भाजप-शिंदे गटाचे चार उमेदवार निवडून आले आहेत. खडसे समर्थक डॉ. बी. सी. महाजन लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरमधील परिवर्तन चौकात जल्लोष केला उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla eknath khadse panel wins kurha kakoda gram panchayat in muktainagar taluka amy