लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: नोव्हेंबर २०१४ पासून जळगावकरांची शहर बससेवा बंद आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानंतर ओमसाई सिटी सर्व्हिसेसने शहर बससेवा दिली होती. करारनाम्यातील अटी-शर्तींची पूर्तता न केल्याने आणि थांब्यासाठी जागा न दिल्यामुळे शहर बससेवा बंद झाली. आता लवकरच जळगावकरांच्या सेवेत ५० ई-बस धावणार आहेत. त्या महापालिकेला लवकरच पीएम बससेवा योजनेंतर्गत मिळणार आहेत.

महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव २३ ऑगस्टला महासभेत मंजूर करण्यात आला होता. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी जिल्हाधिकार्यांना एक सप्टेंबरला पत्र देत बसथांब्यांसह देखभालीसाठी जागेची मागणी केली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महसूलचे तहसीलदार पंकज लोखंडे यांच्यासह अधिकार्यांनी जुने बसस्थानक, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परिसर, सामाजिक न्याय भवनासह अन्य जागांची पाहणी केली. जुन्या बसस्थानकाची जागा योग्य असून, ती ताब्यात घ्यावी. ही जागा शहर बससेवा नियंत्रणासाठी सोयीस्कर होणार आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

हेही वाचा… खैराची तस्करी करणारे दोन जण ताब्यात; बाऱ्हे वनपरिक्षेत्रात लाकूड चोरी रोखण्यात यश

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहानजीकची जागा, अजिंठा चौफुली परिसरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मोठी जागा आहे. तेथे रात्री बस मुक्कामी थांबवून जुन्या बसस्थानकाच्या जागेचा सेवा देण्यासाठी वापर करायचा, असे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. महापालिकेतर्फे शहरालगतच्या २० किलोमीटर परिसरात सेवा देण्यासाठी ई-बस सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी पीएम बससेवा योजनेंतर्गत ५० ई-बस महापालिकेच्या ताब्यात लवकरच मिळणार आहेत

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now soon 50 e buses will be running in the service of jalgaon residents dvr