महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये येत आहेत. त्यात बोम्मई यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. सीमेपलीकडील जनता आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांना निधी दिला जात नाही. मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. कन्नड रक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून या शाळांना निधी दिला जाईल. सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केला आहे, असे बोम्मई यांनी काल ( २ नोव्हेंबर ) पत्रकार परिषदेत म्हटलं. याला आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “हा देश अनेक राज्य एकत्र येऊन बनला आहे. देशात आता संस्थाने राहिली नसून, राज्य आहेत. महाराष्ट्राचे प्रत्येक राज्यांबरोबर आणि कर्नाटकशीही प्रेमाचे संबंध आहे. गुवाहाटीवरून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. तर, मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभे करणार असल्याचं सांगितलं आहे.”

हेही वाचा : “मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा…”, शिवसेनेचे भाजपावर टीकेचे आसूड, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरूनही घेतला समाचार

“मुंबईत अनेक कानडी बांधवांचे भवन, हॉल्स आहेत. आमचा कर्नाटकशी वाद नाही. वाद ते निर्माण करत आहेत. जर इर्षेने सोलापूर आणि कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यावी. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा आहे. त्याबाबत निर्णय व्हावा,” असे आव्हान संजय राऊतांनी मुख्यमंत्री बोम्मईंना दिलं आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reply basavaraj bommai over solapur bhavan ssa