नाशिक – श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे नियोजन पुर्ण करण्यात आले. देवस्थानच्या वतीने वैकुंठ चतुर्दशी व कार्तिकी पौर्णिमा निमित्त रथोत्सव व अन्य काही कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.

मंगळवारी पहाटे दोन ते साडेचार या कालावधी वैकुंठ चतुर्दशी निमित्त विशेष महापुजा, पालखी सोहळा व हरिहर भेट होईल. तसेच दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत देवस्थानच्या वतीने सरदार विंचुरकरांच्या वतीने महापुजा करण्यात येईल. यंदा देवस्थानच्या वतीने विश्वस्थ डॉ. सत्यप्रिय शुक्ल हे सप्तनीक त्र्यंबकेश्वर ज्योर्तिंलिंग येथून प्रभु श्री रामचंद्रास बेलपत्र वाहण्याकरता पंचवटी येथील काळाराम मंदिरात येतील व तेथील तुळशीपत्र प्रभु श्री त्र्यंबकराजालांना वाहण्याकरता काळाराम मंदिर येथुन घेऊन येतील.

५ नोव्हेंबर रोजी सकाळी देवस्थानच्या वतीने साडेनऊ वाजता गंध अक्षदेचा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमास देवस्थानचे आजी माजी विश्वस्थ तसेच सर्व समाजाचे अध्यक्ष पदाधिकारी बोलविण्यात येणार आहे. तसेच दुपारी चार वाजता रथोत्सवास सुरूवात होणार आहे. श्री त्र्यंबकराजांची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून तीर्थराज कुशावर्त येथे महापुजा करण्यात येईल. या ठिकाणी दिपमाळेचे पूजन व प्रज्वलन विश्वस्तांच्या वतीने महापुजा करण्यात येईल. सायंकाळी साडेसहा वाजेपासून प्रभू श्री त्र्यंबकराजांच्या रथाचा मंदिराकडे परतीचा प्रवास असा कार्यक्रम असून रात्री आठ वाजता मंदिर प्रांगणातील दिपमाळ प्रज्वलन व पूजन होणार आहे.

देवस्थानच्या वतीने रथोत्सव

मंगळवारी देवस्थानच्या वतीने मंगळवारी पहाटे दोन वाजे पर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापुजा, पालखी सोहळा, हरीहर भेट असेल. तसेच ४ नोव्हेंबर रोजी सरदार विंचुरकर यांच्या हस्ते महापुजा होईल. ५ रोजी देणगी दर्शन हे दुपारी बारा वाजे नंतर व धर्मदर्शन संध्याकाळी आठ वाजेनंतर बंद राहिल. त्या दिवशी दुपारी चार वाजता रथोत्सवास सुरूवात होणार असून श्री त्र्यंबकराजांची रथातुन मिरवणुक, कुशार्वत तीर्थावर महापुजा तसेच तीर्थराज कुशावर्त येथील दिपमाळाचे विश्वस्तांच्या हस्ते पुजन होईल.

उत्सवादरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी मंदिर कोटाच्या उत्तर महाद्वाराने पटांगणात प्रवेश केल्यावर सभामंडपाच्या उत्तर दरवाजाने आतमध्ये दर्शनास जावयाचे आहे. दर्शनासाठी येतांना स्थानिक ग्रामस्थांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाने श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येतील. स्थानिकांना कार्तिक पौर्णिमेच्यादिवशी सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाने दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी दर्शनासाठी बाहेर जाण्यासाठी दक्षिण दरवाजा व पश्चिम दरवाजा वापर करावा. भाविकांनी तसेच स्थानिकांनी देवस्थानास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.