१९ हजार ८५७ मतदारांचे नकारात्मक मतदान 

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल १९ हजार ८५७ जणांनी ‘नोटा’चा हक्क बजावताना ४१८ उमेदवारांना आपले नकारात्मक मत टाकले आहे. त्यामुळे नकारात्मक मतदानांच्या या आकडेवारीवर राजकीय विश्लेषकदेखील चकित झाले आहेत.

पनवेल पालिकेच्या निवडणुकीत एकूण सव्वाचार लाख मतदार आहेत. त्यांपैकी दोन लाख ३३ हजार ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये एक लाख चार हजार सातशे ३७ महिलांनी आणि एक लाख २८ हजार तीनशे ५८ पुरुषांनी मतदान केले. त्यापैकी जवळपास १९ हजार ८५७ मतदारांनी राजकीय पक्षांवरील आपला नाराजीही नकारात्मक मतदानांतून व्यक्त केली आहे.

मतांच्या टक्केवारीत भाजप अव्वल

२० प्रभागांसाठी झालेल्या मतदानात १८ प्रभागांमध्ये चार नगरसेवक व दोन प्रभागांमध्ये तीन नगरसेवक असे ७८  उमेदवार निवडणूक येणे अपेक्षित होते. शेकाप महाआघाडी विरोधात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना असल्यामुळे शेकापला ७८ जागांवर उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे भाजपला सर्वाधिक चार लाख ३६ हजार १३७ मते मिळाली. असून शेतकरी कामगार पक्षाला दोन लाख ५५ हजार ९८ दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

निवडणुकांमधील मतदानांची टक्केवारी

             २०१४ विधानसभा निवडणूक मत             पनवेल पालिका निवडणूक मत

भाजप        एक लाख २५ हजार १४२                        चार लाख ३६ हजार १३७

शेकाप      एक लाख ११ हजार नऊशे २७                  दोन लाख ५५ हजार ९८

शिवसेना       १७ हजार नऊशे ५३                            ६९ हजार सातशे १६

काँग्रेस          नऊ हजार दोनशे ६९                            ५४ हजार ३४

राष्ट्रवादी काँ.    दोन हजार सातशे ३२                     २५ हजार नऊशे २४

मनसे           ६ हजार पाचशे ६८                              १० हजार दोनशे १६

नोटा         दोन हजार सहाशे ६६                            १९ हजार आठशे ५७