पनवेल : पनवेल शहरामध्ये मंगळवारी सकाळी गुढीपाडवा म्हणजेच नववर्ष स्वागत शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून ऐक्याचा संदेश देण्यात आला. यंदाचे नववर्ष स्वागत यात्रेचे हे २६ वे वर्ष असून शहरातील ‘नववर्ष स्वागत समिती’ने या शोभायात्रेचे आयोजन केले. मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील वडाळे तलाव (बांठीया बंगला) येथून या शोभायात्रेला सूरुवात झाली. वडाळे तलाव ते गावदेवी मंदीर येथून निघालेल्या शोभायात्रेमध्ये महिलांसह बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. पारंपारीक वेशभूषा परिधान करुन स्त्रीयांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालकांचा या शोभायात्रेतील सहभाग लक्षवेधक ठरला. महिलांच्या गार्गीज ग्रुप बंगाली समुह तसेच मणिपूर इम्फालची प्रतिकृती एका रथामध्ये सजविण्यात आली होती. महिला दुचाकीस्वारांचा एक समुह या यात्रेत महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दर्शन घडवीत होते. पंजाब प्रदेश येथील अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती असलेला एक समुह पंजाबी वेशभूषेत पंजाबचे नेतृत्व करीत होता. गार्गीज ग्रुपच्या महिलांनी जम्मू काश्मीरची वेशभूषा दाखवून काश्मीरचे देशातील महत्व सांगणारे फलक हाती घेतले होते.

हेही वाचा – दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील

पनवेलच्या युवानाद ढोलपथकाच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता. या ढोलपथकामध्ये महिला व तरुणींचे प्रमाणे सर्वाधिक होते. गंधार कलसंस्थेच्या बालकलाकार तसेच हिमालयन ध्यान केंद्राच्या प्रौढांनी स्वास्थाप्रती संदेश देण्यासाठी ध्यानाची गुढी उभी करणारा फलकात जनजागृती केली. वनवासी कल्याणी आश्रमातील मुले, वसुंधरा फाऊंडेशनच्या बालकांच्या चित्ररथामध्ये बळीराजाच्या आत्महत्येविषयी बोलकी प्रतिकृती उभी केली होती. बळीराजा तुझ्याशिवाय जग राहील उपाशी अशी हाक या रथामार्फत देण्यात आली होती. या रथामध्ये संपूर्ण शेती व भाजी जगण्यासाठी किती महत्वाची आहे याचे चित्र उभे करण्यात आले.

हेही वाचा – पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

कै. रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या आदिवासी कर्णबधीर आणि मतिमंद निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शोभायात्रेत सहभाग होता. गावदेवी मंदीराच्या चौकात शोभायात्रेत सामिल झालेल्या बालकांना शेकापचे नेते प्रितम म्हात्रे यांनी पेढे भरवून त्यांचे स्वागत केले. जीवनविद्या मिशनच्या महिला सदस्यांनी शरीर साक्षात परमेश्वर हा फलक हाती घेऊन जनजागृती केली. मंगळवारच्या शोभायात्रेत चित्ररथ, बॅण्ड पथक, लेझीम पथकाचा सहभाग होता. गावदेवी मंदीरानंतर आगरी समाज सभागृह, लाईनआळी येथून मारुती मंदिर आणि सी. के. पी. सभागृह ते प्रभू आळीनंतर विरुपाक्ष मंदीर शिवाजी रोड, जय भारत नाका, टिळक रस्ता या मार्गे फिरुन शोभायात्रेची सांगता स्वा. सावरकर चौकात होणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A message of unity through diversity with woman power in panvel procession ssb