खारघर: सिडकोने आमच्या स्वप्नांची घोर निराशा केली असून, गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीसाठी आमचे हाल करण्यात येत आहेत. धरणांत पाण्याची कोणतीही समस्या नसताना आपल्याच संकुलांना काही काळ पाणीपुरवठा करण्यातदेखील सिडको अपयशी ठरत आहे.’ असे खारघर सेक्टर ३६ मधील रहिवासी महेश गीते यांनी सांगितले. गेल्या वर्ष-दीड वर्षभरापासून सिडको येथील पाणीपुरवठ्यात ‘गडवड’ करून इथल्या पाण्याला परस्पर इतर गावांना वळविण्याचे उद्योग करीत आहे. त्याचबरोबर टैंकरलांबी आणि पाणी विकणाऱ्या कंपन्यांशी संगनमत करीत या संकुलात वाटेल तशी कृत्रिम टंचाई करीत असल्याचा आरोप अनेक नागरिक करीत अथहेत. शुक्रवारपासून पंधरा मिनिटेदेखील पाणी न मिळालेल्या नागरिकांनी अखेर सोमवारी सिडकोवर तीव्र राग व्यक्त केला.

सिडकोची घरे घेऊ नका’ ‘सिडकोकडून आमच्या स्वप्नांचा चुराडा’ असे निषेध करणारे फलक या निमित्ताने संकुलात जागोजागी लावण्यात येणार असल्याची माहिती, इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महिला आणि पुरुषांनी हंडा कळश्या घेऊन या परिसरात सिडकोच्या पाण्याबाबतच्या सापत्नभावाबद्दल रोष व्यक्त केला. आमच्या वाटेचे पाणी पाठवल्यामुळे आम्हाला प्यायलादेखील पाणी पुरत नाही, तुम्ही वाटेल तितक्या गाथांना पाणी द्या. मात्र आमच्या वाटेचे पाणी आम्हाला द्या, असे सान्यांचेच म्हणणे होते.

दररोज विकतचे पाणी, सोसावट्यांमधील तंटे, पाण्याचा दररोज कमी होत चाललेला पुरवठा यांमुळे जेवणापासून कपडे सुण्यापर्यंत आणि घराच्या सफाईच्या प्रश्नांपासून दैनंदिन स्वच्छतेच्या कामांकरिता पर्याप्त पातळीवर पाणी कुठून आणावे, हा प्रश्न येथील महिलावर्गाला भेडसावत आहे. सकाळी आपण घरात नसण्याच्या वेळेत पाणी आले तर काय या भीतीने काही गृहिणी बाहेरच पडत नाहीत. दिवसभर पाण्याची वाट पाहण्यात जातो. गेल्या आठवडधापासून अध्यां तासाइतकेदेखील पाणी कुणाला मिळाले नाही, अशी माहिती वीणा जाधव यांनी दिली.

घरटी समस्या एकच प्रतिव्यक्ती दोनशे ते तीनशे रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यातूनदेखील जेवण-धुणीभांडी आणि कपडे धुण्याची पुरेशी कामे होत नाहीत. जेवण बनविण्यासाठी, धुलाईयंत्रे चालविण्यासाठीदेखील निर्धारित वेळेत पाणी लाभत नाही. काही घरांमध्ये पाण्याच्या रोजच्या समस्येमुळे लहान मुले आणि वृद्धांचे तीच हाल होत आहेत. महिन्याभराच्या कुटुंबाच्या खर्चात पाण्याचा आणखी खर्च दररोज चाडत चालला असल्याचे येथील रहिवासी निशा धोत्रे यांनी सांगितले. नागरिकांचे संतप्त प्रश्न

खारघरमधील पाणी इतर ठिकाणी पळवता, मग आम्ही काय करायचे? दररोज बाहेरचे पाणी विकत घ्यावे लागते. तेदेखील मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. स्वस्त घरांचा सिडकोचा प्रकल्प आमच्यासाठी मोठी फसवणूक ठरला. पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना आठवड्याभरात पाच दिवस पाणीकपात करताना लाजा वाटत नाहीत काय? असा सवाल नागरिक करीत आहेत.

सण जवळ आणि स्वच्छता दूर येणाऱ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या पाणीपुरवठ्यामध्ये प्यायचे पाणीदेखील धड मिळत नाही. अर्ध्या इमारतीत वरच्या टाकीतील पाणी सोडले की पहिले सर्वात खालच्या घरांत पाणी जाते. सर्वांत वरच्या मजल्यांवर झिरपत झिरपत उरलेले पाणी पाच मिनिटेदेखील पुरत नाही. सण जवळ आला असताना स्वच्छता आम्हालाही करता येत नाही आणि ‘अर्बन कंपनी’ सारख्या सेवा घेता येत नाहीत. कारण पंधरा मिनिटे साठवलेल्या पाण्यात त्यांना स्वच्छता करता येत नाही.

खारघर उपनगरातील स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यास सिङको तातडीने सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना उपाययोजना करण्याच्या सूचना आजच देत आहे. रहिवाशांचे निवेदन सिडकोकडे प्राप्त झाले असेल, माझ्याकडे असे कोणतेही निवेदन आले नाही. असलेल्या पाणी पुरवठ्यातून या रहिवाशांचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूचना दिल्या जातील, या प्रश्नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याविषयी काही आराखडा बनवला आहे का याची माहिती घेतली जाईल. लवकरच हा पाणी प्रश्न सिडको मार्गी लावेल. -डॉ. राजा दयानिधी, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ