नवी मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रबाळे एमआयडीसी स्थित आर ४४५ भूखंडावर असलेल्या एका कंपनीत आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पहाटे चार वाजता अग्निशमन दलाला यश आले आणि दहा मिनिटांत येथून काही अंतरावर रबाले एमआयडीसीतील डब्ल्यू ३३४ भूखंडावरील एका रंग बनवणाऱ्या कंपनीला आग लागली.

हेही वाचा – नवी मुंबई : अमली पदार्थप्रकरणी विदेशी नागरिकास अटक, व्हिसाचीही मुदत संपलेली

हेही वाचा – राज्यात तब्बल ६२ हजार टन मासेमारी अवैध पद्धतीने, पर्ससीन पद्धतीचा सर्रास वापर सुरूच

रंग बनवणारी कंपनी चार माळ्यांची असून पाऊण तासात आग चारही माळ्यांपर्यंत पोहोचली. आगीत कोणी जखमी झाले नाही. ही आग विझवण्यास अजून किमान पाच ते सहा तास लागतील, असा अंदाज रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.