उरण येथील मुख्य रस्ता असलेल्या उरण पनवेल राज्य महामार्ग ५४ वरील फुंडे खाडी पूल २०२१ पासून नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे बोकडविरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या चार गावातील हजारो नागरिक व विद्यार्थी यांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी चारही गावातील ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- महिला ब्रश घेऊन बाहेर पडली अन् थोडक्यात वाचला जीव, स्वयंपाकघरातून बाहेर पडताच छत कोसळले

यासाठी सिडको कार्यालयात अनेक बैठका,अर्ज, निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. त्यामुळे तो दुरुस्तीसाठी सिडकोकडे हस्तांतरीत करण्याची गरज आहे. यासाठी सावजिनक बांधकाम विभागाने सिडको कार्यालयात पत्रव्यवहारी केला आहे. मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने हा पूल दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.

हेही वाचा- पती, पत्नी आणि ‘तो’ प्रकरणात पतीची आत्महत्या

उरण पनवेल मार्गावरील खाडीपूल नादुरुस्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड व उंचीची वाहने ये जा करू नये म्हणून हाइट गेट लावण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरन जाणारी एस. टी. व एन. एम. एम.टी. ही सार्वजनिक बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चारही गावातील नागरीकांना पाच किलोमीटरचे अंतर रिक्षा किंवा खाजगी वाहनाने पार करून नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या गेटमुळे आतापर्यंत १४ पेक्षा अधिक वाहनाना अपघात झाला आहे. याचा फटका उरण मधून रुग्णांना उपचारसाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि आगीच्या घटनेनंतर वेळेत पोहचू न शकणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आगीच्या घटनांच्या वेळी अग्निशमन दलाची वाहनाना उशीर होत असून उरणमधील नागरिकांच्या रुग्णांच्या जीवलाही धोका वाढला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा- महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेचा समारोप

यासंदर्भात सिडको व सार्वजनिक बांधकाम या दोन्ही विभागांची बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती उरणच्या तहसीलदारांनी दिली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता सिडकोला वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची व पुलाच्या दुरुतीसाठी दीड कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी दिली.मात्र तरीही उरणमधील नागरिकांना या नादुरुस्त पुलाच्या दुरुस्तीची प्रतिक्षा कायम आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funde khadi bridge on uran panvel route is damaged navi mumbai dpj