नवी मुंबई : एकीकडे बोचऱ्या थंडीची चाहूल लागली की बाजारातही सगळीकडे टपोरे दाणे भरलेले हिरवे मटार नि लालचुटूक गाजरे नजरेस पडतात. मग आपसूक मटार पुलाव आणि गाजर हलव्याचे बेत ठरतात. सध्या घाऊक आणि किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे वर्षभर गगनाला भिडलेले दरही निम्म्यावर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घाऊक तसेच किरकोळ बाजारात गगनाला भिडलेल्या वाटाण्याचा नोव्हेंबर अखेरीस स्वस्ताईचा हंगाम सुरू होतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाला असून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रतिकिलो शंभरी पार केलेल्या हिरव्या वाटाण्याचे दर निम्यावर उतरले आहेत. मागील आठवड्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो १००-१२० रुपयांवरून उपलब्ध असलेला वाटाणा आता ६०-७० रुपयांवर विक्री होत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही वाटाणा आवाक्यात आहे.

हेही वाचा…पनवेलमध्ये शेकापची झुंज गावांपुरतीच? शहरी पट्ट्याने शेकापला पुन्हा नाकारल्याचे चित्र

सोमवारी एपीएमसीत १८ गाड्यांतून १२५० क्विंटल आवक झाली आहे. घाऊक बाजारात सध्या वाटाणा ६०-७०रु. तर किरकोळ बाजारात ८०-९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पुढील कालावधीत आणखी आवक होऊन दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. एक महिन्यापूर्वी घाऊक बाजारात वाटाणा १००-१२० रुपये प्रति किलो उपलब्ध असणारा वाटाणा,आता प्रतिकिलो ६०-७० रुपयांनी विक्री होत आहे तर किरकोळ बाजारात ८०-९०रुपये विक्री होत आहे. एपीएमसीत आता हिरव्या वाटण्याचा हंगाम सुरू झाला असून दर उतरले आहेत. डिसेंबरमध्ये आवक वाढणार असून दर आणखी गडगडतील. – बाळासाहेब बडदे, घाऊक व्यापारी,एपीएमसी

हेही वाचा…मुलाच्या पराभवामुळे गणेश नाईकांपुढे आव्हान ?

ब्लर्ब

वर्षभर बाजारात किरकोळ प्रमाणात उपलब्ध असला तरी डिसेंबर महिन्यात मटारचा खरा हंगाम सुरू होतो. घाऊक तसेच किरकोळ बाजारात गगनाला भिडलेल्या वाटाण्याचे दर आता निम्म्यावर आले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green peas are flooding in markets prices which soared to drop by half sud 02