उरण : बुधवारी दुपारी ११ वाजता उरण पनवेल मार्गावरील फुंडे हायस्कुल जवळील हाईट गेटला टेम्पो धडकला. हाईट गेटमुळे या मार्गावर झालेला आतापर्यंतचा हा १६ वा अपघात आहे. या अपघातानंतर उरण पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आशाच प्रकारे बोकडवीरा येथील हाईट गेट टेम्पो अपघातात कोट गावातील एक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे वाढत्या अपघातामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासी व नागरीकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – जेएनपीटी- पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर उलटला; वाहनाखाली आल्याने एकाचा मृत्यू 

हेही वाचा – नवी मुंबईत व्हायरल तापाची साथ, बाह्यरुग्णांत ५०% रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याचे

२०२१ पासून सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालय व फुंडे स्थानकालगतच्या नादुरुस्त खाडी पुलामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जड व प्रवासी वाहनांना रोखण्यासाठी उरण पनवेल मार्गावर हाईट गेट बसविले आहेत. बोकडविरा व फुंडे महाविद्यालयाजवळील दोन्ही बाजूच्या हाईट गेटमुळे मर्यादेपेक्षा अधिक उंचीच्या वाहनचालकांना उंचीचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in accidents due to height gate on uran panvel route ssb