उरण : जेएनपीए बंदरातील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवा या मागणीसाठी केंद्रीय बंदर विभागाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय कामगार नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या बरोबर देशातील बंदर कामगारांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली. तसेच कंत्राटी कामगारांचेही प्रश्न मांडण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या संबंधीचे निवेदन केंद्रीय नौकानयन मंत्री श्रीपाद नाईक साहेबांना भारतीय मजूर संघाचे राष्ट्रीय  महामंत्री सुरेश पाटील आणि गोवा प्रदेशचे महामंत्री के. प्रकाश,  व रायगड जिल्हा बीएमस उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याकडून देण्यात आले. यावेळी देशातील बंदर कामगारांचा थांबलेला वेतन करार लवकरात – लवकर करावा तसेच जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्याची थकबाकी लवकर द्यावी अशी मागणी  करण्यात आली व मागणीचे निवेदन देण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Labour union leader suresh patil meet union minister shripad naik to resolved contract workers issue in jnpa zws