पनवेल : पनवेलमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले असून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. तसेच ताप, खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण तसेच मलेरियाचे रुग्ण वाढल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर पनवेलमध्ये साथरोगावर नियंत्रणासाठी ‘लोकसभा’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘लोकसभे’ची पहिली बैठक गुरुवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये किटकजन्य आजारावर नियंत्रण व प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना तसेच जनजागृतीचे आयोजन लोकसभा या बैठकीत आरोग्य विभागाने करण्याच्या सूचना सर्व पालिकांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पनवेल पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

हेही वाचा – Talathi Exam Result : तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…

हेही वाचा – बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाला महागाईची झळ, दरात प्रतिकिलो ५ ते १० टक्क्यांची वाढ

या बैठकीचे अध्यक्ष पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे असणार आहेत. खासगी वैद्यकीय व्यवसाय धारक, सर्व प्रयोगशाळा, ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, पालिकेचे शहर अभियंता संजय जगताप, आरोग्य विभाग, एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश या बैठकीत असणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha tomorrow in panvel for health issue ssb