नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली नोड अंतर्गत असणाऱ्या गोठीवली गावातील पाच मजली अनधिकृत इमारतीवर सिडको आणि मनपाने संयुक्त रित्या कारवाई करीत इमारत पाडली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोठीवली गावात पांडुरंग म्हात्रे यांनी विकासक मुकेश पटेल यांना हाताशी धरून एक पाच मजली  इमारत बांधली. मात्र हि इमारत बांधताना कुठलीही परवानगी घेतली नाही. तसेच सिडको हस्तांतरण झालेल्या जमिनीवर हि इमारत बांधण्यात आलेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बाबत समंधित  लोकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सिडको आणि नवी मुंबई मनपाने संयुक्त रित्या केलेल्या या कारवाईत इमारतीचा मोठा भाग पाडण्यात आला. हि कारवाई दिवसभर सुरु होती. या कामात अडथळा येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी सिडको आणि मनपाचे अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai five floors unauthorized building cidco action ysh