“स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या अनुषंगाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाशी सेक्टर १० ए येथील मिनी सीशोअर येथे नवी मुंबईतील २०७ तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन “स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग” असे म्हणत परिसराची साफसफाई केली. तसेच त्या परिसरात रॅली काढून जनजागृती केली. या उपक्रमात त्यांनी हिरव्या, निळ्या व काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाचे महत्व पोषाखातून पटवून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पनवेलमधील तृतीयपंथींना मिळणार हक्काचे घर; पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेत ५० घरे राखीव

लेट्स सेलीब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणाऱ्या राष्ट्रीय मानांकित संस्थेने घेतली आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता नवी मुंबई महानगरपालिकेस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai record breaking record of transgender cleanliness