navi mumbaikar purchase vehicle on dussehra festival zws 70 | Loksatta

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांची जोरदार वाहन खरेदी ; पाच दिवसात ६१६ वाहनांची  नोंद

साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताची संधी साधून नवी मुंबईकरांनी जोरदार वाहन खरेदी केलेली आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांची जोरदार वाहन खरेदी ; पाच दिवसात ६१६ वाहनांची  नोंद
(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : मागील दीड वर्षांपासून करोना आणि टाळेबंदीने आर्थिक मंदीचा फटका सर्व सामान्यांना बसला होता.  परंतु यंदाचे वर्ष सर्वच सण उत्सव करोना मुक्त नियमातून साजरे करण्यात येत आहे. तसेच सर्वांचा रोजगार पूर्वपदावर आलेले आहेत.  त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा नवी मुंबईकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. 

साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताची संधी साधून नवी मुंबईकरांनी जोरदार वाहन खरेदी केलेली आहे.  एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत एकूण ६१६ नवीन वाहनांची नोंद झालेली आहे.

नवी मुंबई शहराचा ही झपाट्याने विकास होत असून या शहरात राहण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात येत आहे . जशी लोकसंख्या वाढत आहे तसेच शहरातील वाहन संख्या ही वाढत आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिक वाहन खरेदीला पसंती देत असतात. मात्र मागील दोन वर्षे  करोना , टाळेबंदीने नागरीक आर्थिक संकटात सापडल्याने वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागला होता. सन २०२० दसऱ्याच्या दिवशी अवघे ६३ नवीन वाहने तर मागील वर्षी १०२ वाहनांची तर यंदा १११ वाहनांची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षात करोना मुळे देशाला आर्थिक मंदिचा फटका बसला होता.  त्याचा परिणाम नवीन वाहन खरेदीवर देखील झाला होता .परंतु आता उद्योगधंदे ,व्यवसायात उभारी घेत असून आर्थिक परिस्थिती ही सुरधारत आहे. त्यामुळेच की काय यंदा उत्साहाने नागरिकांनी नवीन वाहन खरेदी केलेली आहे. यावर्षी दि. १ ऑक्टोबर ते दसरा दि.५ऑक्टोबर या दरम्यान ६१६ नवीन वाहनांची नोंद कर करण्यात आली असून यामध्ये दुचाकी २८३ आणि २३९ चार चाकी वाहनांची संख्या अधिक आहे.

करोनामुळे आर्थिक मंदीचे सावट होते.  त्याचापरिणाम नवीन वाहन खरेदीवर झाला होता. मात्र आता आर्थिक परिस्थिती उभारत असून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, वाशी

वाहन प्रकार                                संख्या

दुचाकी                                     २८३

चार चाकी                                     २३९

बस                                   १

चार चाकी व्यवसायिक वाहने            ५२

मोटर कॅब                                       ४

तीन चाकी व्यवसायिक वाहने          ३

रिक्षा                              ७

इतर                                              २६

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबईत पावसाने नवरात्रीत घेतलेल्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा पावसाला सुरवात ; बेलापूरमध्ये सर्वाधिक पाऊस

संबंधित बातम्या

उरण : ‘ती’ बोट संशयित नसल्याचा पोलिसांचा दावा ; बोटीतील अतिरिक्त ३५० लिटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत
नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी
उरण चारफाट्यावर बेशिस्त वाहन पार्किंग; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये ३ पिस्तुलं, ११ जिवंत काडतुसे, ६ कोयते जप्त; सात जणांना ठोकल्या बेड्या
मुंबई: राज्यातील किमान तापमानात वाढ होणार
‘राज ठाकरे हेच खरे जातीयवादी’; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा