nerul pfi office closed board also removed zws 70 | Loksatta

नेरूळ पी.एफ. आय. कार्यालय बंद ; फलकही काढला

देशभरात पीएफआय संघटने वरती सुरू असलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय

नेरूळ पी.एफ. आय. कार्यालय बंद ; फलकही काढला
पीएफ आय च्या नेरूळ मधील कार्यालयाचा बोर्ड स्थानिक पोलीस प्रशासनाने काढण्यास लावलाय.

 नवी मुंबई  :पाँप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी आणल्यानंतर नवी मुंबईतील नेरूळ येथील पी.एफ.आय च्या कार्यालयाचा बोर्ड स्थानिक पोलीस प्रशासनाने काढाण्यास लावला आहे. पी.एफ.आय चे नेरूळ प्रमुख शेख मोहम्मद आसिफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत स्थानिक पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यालयावरील बोर्ड काढला असल्याची माहिती दिलीय..

हेही वाचा >>> पनवेल : शव बदलल्याने अंत्यसंस्काराला जाणाऱ्या नातेवाईकांची उडाली धावपळ

मंगळवारी नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातून दोन जणांना अटक केल्या नंतर पी एफ आय विरोधात कारवाई सुरु आहे. देशभरात पीएफआय संघटने वरती सुरू असलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय. नवी मुंबई देखील पीएफआयच्या कार्यालयावरती तसेच अनेक पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेय. पी एफ आय या संघटने वरती पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पी एफ आय चे कार्यालय तसेच मुस्लिम मोहल्लांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. पीएफ आय च्या नेरूळ मधील कार्यालयाचा बोर्ड देखील स्थानिक पोलीस प्रशासनाने काढण्यास लावलाय. एकूणच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. आसिफ शेख (पी.एफ.आय. अध्यक्ष नवी मुंबई) : संघटनेवर बंदी घातल्याचे प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे कळले. तसेच पोलिसांनी संघटनेचा कार्यालय वर लावण्यात आलेला फलक काढण्यास सांगतले. त्या सूचनेनुसार आम्ही फलक काढला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पनवेल : शव बदलल्याने अंत्यसंस्काराला जाणाऱ्या नातेवाईकांची उडाली धावपळ

संबंधित बातम्या

नवी मुंबईतील माजी नगरसेवकावर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल
पनवेल : प्रियांका रावत खूनाप्रकरणी सहाजणांना अटक – पोलीस उपायुक्त शिवराज पाटील
…म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे : रामदास आठवले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”
IND vs BAN 1st ODI: भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान, जाणून घ्या पहिली वनडे कधी आणि कुठे बघायला मिळणार
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!
हैद्राबादच्या निजामाच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई