लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : मोबाइलवर जी पे खाते उघडून बँकेला जोडून देण्याची प्रक्रिया येत नसल्याचा गैरफायदा घेत एका व्यक्तीची २ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
नेरुळ येथे राहणारे विनोद तिवारी यांना मोबाइलवर जी पे खाते सुरू करायचे होते. मात्र ते त्यांना जमत नसल्याने जुजबी ओळख असलेले शिमसिंग यादव उर्फ लालसाब यादव यांनी त्यांना मदत असल्याचे भासवत फोन स्वतःकडे घेतला. ज्या बँकेशी जीपे जोडणे आवश्यक आहे त्या बँकेची माहीत त्याने तिवारी यांच्या कडून घेतली. आणि काही वेळात करून देतो सांगत तेथून निघून गेला. दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी जी पे खाते उघडून त्या द्वारे विविध खात्यात २ लाख १९ हजार वळते केले. नेरुळ पोलिसांनी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.