Premium

रेवस जेट्टी रखडल्याने करंजा-रेवस रो रो सेवेची प्रवाशांना प्रतीक्षाच

अलिबाग तालुक्यातील रेवस बंदराच्या जेट्टीच्या कामाच्या दिरंगाईमुळे उरणच्या करंजा ते अलिबाग मधील रेवस बंदराच्या दरम्यानची रो रो जलसेवा सुरू झालेली नाही.

Passengers have to wait for the Karanja-Revas row service due to Revus jetty work stopped
संथ गतीच्या कामासाठी जबाबदार कोण? प्रवाशांचा सवाल (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : अलिबाग तालुक्यातील रेवस बंदराच्या जेट्टीच्या कामाच्या दिरंगाईमुळे उरणच्या करंजा ते अलिबाग मधील रेवस बंदराच्या दरम्यानची रो रो जलसेवा सुरू झालेली नाही. या रखडलेल्या आणि संथगतीने होणाऱ्या कामाला जबाबदार कोण असा सवाल या मार्गावरील संतप्त प्रवाशांनी केला आहे.

उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यासाठी सात वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या मार्गाला जोडणाऱ्या अलिबाग मधील रेवस जेट्टी चे काम रखडल्याने ही सेवा सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील प्रवासी व नागरिकाकडून केली जात आहे.

आणखी वाचा-११ हजार दिव्यांच्या दीपोत्सवात सुधागड उजळून निघाली

उरण व अलिबाग या दोन तालुक्यां दरम्यान दोन किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोटया बोटीचा ( तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली त्यानुसार २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो रो ची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर,कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबाग मधील रेवस जेट्टी चे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उरण व अलिबागमधील अंतर कमी होणार

या रो रो सेवे मुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील ५० किलोमीटर पेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे.

उरण ते अलिबाग दरम्यानच्या जलद आणि वाहनासह प्रवास करण्यासाठी प्रस्तावित रो रो सेवा लवकरात लवकर सुरू अशी मागणी उरण मधील निवृत्ती कर्मचारी अशोक म्हात्रे यांनी केली आहे.

आणखी वाचा-१३ किलोमीटरच्या खोपटे ते चिरनेर मार्गे दास्तान रस्त्याचे होणार काँक्रीकरण

प्रवासी संख्या वाढली

उरण मधील वाढते उद्योग आणि नवी मुंबईच्या जवळ असणारे शहर म्हणून नोकरी,व्यवसाय व शिक्षण यानिमित्ताने उरण ते अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेवस जेट्टीवर वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Passengers have to wait for the karanja revas row service due to revus jetty work stopped mrj

First published on: 29-11-2023 at 18:17 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा