नवी मुंबई – नवी मुंबई शहरातील बेलापूर व नेहरू विभागाला सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान अर्ध्या तासात चांगलेच झोडपले. ढगांचा गडगडात व विजांच्या कडकडाटासह बेलापूर व नेरूळ विभागात जोरदार पाऊस झाला. ३० मिनिटाच्या कालावधीत बेलापूर विभागात १६मिलिमीटर पेक्षा अधिक तर नेरूळ विभागात १९  मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न; महापालिकेचा खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा फोल

कमी कालावधीत पडलेला जोरदार पावसामुळे बेलापूर व नेरूळ विभागातून वाहतूक मंदावली होती. दुसरीकडे वाशी व कोपरखैरणे विभागात रिमझिम पावसाची नोंद झाली तर ऐरोली दिघा परिसरात पाऊसच पडला नाही. नेरूळ व बेलापूर विभागात अचानक पडलेल्या पावसामुळे काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले होते. तर कामावरून परतणार या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

चौकट.. आजचा पाऊस

बेलापूर – १६ .४० मिमी.

नेरूळ – १९.८० मिमी.

वाशी – १.मिमी.

कोपरखैरणे – ०.०६ मिमी.

ऐरोली- ०० मिमी.

दिघा – ०० मिमी.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in navi mumbai nerul recorded 19 80 mm rainfall in half an hour zws