नवी मुंबई : येत्या एक दोन दिवसांत मुंबई आणि परिसरात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आज सकाळपासून नवी मुंबईतील हवामान ढगाळ होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात पाच ते दहा मिनिटे जोरदार सरी कोसळल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाऊस जरी पाच दहा मिनिटे पडला, तरी नौकरदार आपापल्या कामाला जायच्या वेळी बाहेर पडल्याने त्यांची त्रेधा उडाली. त्यातही काहीजणांनी छत्री आठवणीने घेतल्याचे चित्र दिसत होते. 

हेही वाचा – तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या नायजेरियन इसमाकडून अंमली पदार्थ विक्री सुरू, पुन्हा करण्यात आली अटक

दोनच दिवसांपूर्वी कोपरखैरणे  सेक्टर १९, २०, १ ते ४ या परिसरात हलका पाऊस पडला. मात्र येथून काही अंतरावर असलेल्या सेक्टर ८, ९, १०, ११, १२ परिसरात मात्र पावसाचा मागमूस नव्हता. आज मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. नवी मुंबईतील घणसोली ऐरोलीच्या काही भागातही थोडा पाऊस पडला. त्यात दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून हवेत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने या पावसाने काहीसा गारवा जाणवत असल्याने दिलासा मिळाला आहे.  

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall in navi mumbai as per forecast of meteorological department ssb