उरण : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणानुसार, नगर परिषदेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत, यामुळे निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय असेल. २१ जागांवर विविध प्रवर्गांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे.
मागास प्रवर्गासाठी एकूण ६ जागा आरक्षित आहेत. यापैकी ३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण २ जागा आरक्षित आहेत. यापैकी १ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी कोणतीही जागा आरक्षित नाही. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण १३ जागा आरक्षित आहेत. यापैकी ८ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलली असून, आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना व उमेदवारांना त्यानुसार आपली रणनीती आखावी लागणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण असे
प्रभाग १ – अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग २ – अ अनुसूचित जाती – महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग ३ – अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग ४ – अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला. प्रभाग ५ – अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग ६ – अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ – अ सर्वसाधरण महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग ८ – अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण. प्रभाग ९ – अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला प्रभाग १० – अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब सर्वसाधण असे आरक्षण पडले आहे.