पनवेलमधील जुन्या टपाल कार्यालयाशेजारी असणाऱ्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर अर्थात दगडी शाळेमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या या शाळेत दीडशे विद्यार्थी शिकत आहेत. एकेकाळी भरभराटीस असणाऱ्या या शाळेची सध्या दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या टाकीतील पाणी शुद्ध राहावे यासाठी कोणतीही नियमित उपाययोजना केली जात नाही, तसेच येथील स्वच्छतागृहांना स्वच्छतागृहे का म्हणावे, अशी परिस्थिती आहे. शाळेतील दीडशे विद्यार्थी व सहा शिक्षकांना या गैरसोयींना रोजच तोंड द्यावे लागते. केवळ अनास्थेमुळेच या शाळेची दुर्दशा झाली असून पालिकेने या शाळेकडे लक्ष देऊन तेथे योग्य सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी एका निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे.
म्हात्रे यांचे निवेदन अद्याप आम्हाला मिळालेले नाही, तरीही हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यामंदिराला लवकरच भेट देऊन त्याची पाहणी केली जाईल. प्रशासकीय स्तरावर विद्यालयाच्या स्वच्छतेचे काम का रखडले, याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
-चारुशीला पंडित, अतिरिक्त मुख्याधिकारी,     पनवेल नगर परिषद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stink at panvel dagadi school