रेल्वेवरील ११ जुलै २००६च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर २६ नोव्हेंबर २००८च्या दहशतवादी हल्ल्यावेळीही सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे कमी पडल्याचे निदर्शनास आले होते . त्यामुळे २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईसह सर्व ठिकाणच्या रेल्वे स्थानकामधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सध्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलच्या दररोज ६०० फेऱ्या असून २५ ते २६ लाख प्रवासी नित्याने प्रवास करत असतात. मात्र या प्रवाशांसाठी या मार्गावर एकूण अवघे ८१ पोलीस कर्मचारी तैनात आहेत. या ठिकाणी १५० ते २०० पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु या कमी मनुष्यबळामध्ये देखील येथील पोलीस कर्मचारी रेल्वे प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : अखेर जेएनपीटी उड्डाणपुल झाला खड्डेमुक्त; नागरिक व वाहनचालकांना दिलासा

नवी मुंबई वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील गोवंडी ते सिवूड आणि गोवंडी ते रबाळेपर्यंत ११ स्टेशन येत असून या ११ स्टेशन करिता ८१ पोलीस कर्मचारी तैनात आहेत. नवी मुंबई शहरात सिडकोच्या माध्यमातून अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली गेली आहेत. या स्थानकात इतर कार्यालये देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रवशांसोबत इतर नागरिक देखील रेल्वे स्थानकात ये जा करत असतात. रेल्वेतील चोरी, हाणामारी, रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यातील सुरक्षा ,रेल्वे अपघात इत्यादी रेल्वे सुरक्षिते करिता हे रेल्वे पोलीस कर्तव्य बजावत असतात. परंतु या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज लोकलच्या ६०० फेऱ्या होतात आणि यामधून जवळजवळ २५ ते २६ लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे एवढ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमीत कमी १५० ते २०० रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने येथील रेल्वे पोलीस कर्मचारी त्या-त्या घटनाानुसार अपघात, चोरीची घटना किंवा अन्य घटनांच्या आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी प्राधान्य देऊन आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असतात.

हेही वाचा- नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांना पालिकाच जबाबदार! तोडक कारवाईत अधिकारीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र

परंतु या सर्वांमध्ये दुसऱ्या ठिकाणी सुरक्षा देताना इतर ठिकाणी सुरक्षा इकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. सन २००८ साली दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात हल्ला केल्यानंतर शहरातील सर्वच मुख्य स्थानकांमध्ये बंकर आणि मेटल डिटेक्टर ठेवण्यात आले होते. वाशी रेल्वे स्थानकात देखील बंकर ठेवण्यात आलेले आहेत. मात्र या ठिकाणी त्या बंकर मध्ये एकही रेल्वे पोलीस कर्मचारी निदर्शनास येत नाही . त्यामुळे या तोकड्या मनुष्यबरळाचा गैरफायदा घेत पुन्हा कोणत्या आपत्तीजनक घटना घडल्या तर? दहशतवादी हल्ला झाला तर? याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कडी सुरक्षा असणे गरजेचे आहे असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

राज्यात सर्वच ठिकाणी रेल्वे पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ आहे. मात्र तरीदेखील रेल्वे अपघात, चोरीच्या घटना इत्यादी मध्ये घटनांच्या क्रमानुसार , आवश्यकतेनुसार प्राधान्य देऊन रेल्वे सुरक्षा पोलीस कर्मचारी तत्परतेने काम करून आपले कर्तव्य बजावत आहेत, अशी माहिती वाशीतील रेल्वे पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stress on railway security due to insufficient manpower on herbal and transfer route dpj
First published on: 07-12-2022 at 18:23 IST