नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका आरोपीस अटक केली असून त्याने केलेल्या आठ गुन्ह्यांची उकल झाली. आरोपी अट्टल चोरटा असून त्याच्या नावावर यापूर्वी ३८ गुन्हे आहेत आरोपी कडे लाल आणि पांढर्या रंगाचे एक जँकेट आहे. जे लकी जँकेट म्हणून प्रसिद्ध असून हे जँकेट आरोपीला अनेक गुन्ह्यात लकी ठरले म्हणून गुन्हा करते वेळी हेच जँकेट परिधान करून घरफोडी करीत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीसीटीव्हीची पाहणी केली असता दर वेळी हेच जँकेट घातलेला इसम आढळून आला. आणि याच लकी जँकेट मुळे खबऱ्यांनी त्याला ओळखला व पोलिसांना माहिती देताच सापळा रचला आणि त्यात तो अडकला. अनेक गुन्ह्यात  लकी जँकेट वापरल्याने आपण पकडले जाऊ अशी शंका त्यालाही होती तो हे लकी जँकेट फेकून देणार होता. मात्र त्यापूर्वीच तो पकडला गेला.

अंकुश उत्तम ढगे असे अटक आरोपीचे नाव असून नववी नंतर त्याने शाळा सोडत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. त्याच्या नावावर आता पर्यत ३८ गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसापासून कोपरखैरणे पोलीस ठाणे क्षेत्रात वाढलेल्या घरफोडी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक  दशरथ विटकर यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. यात , पोलीस हवालदार  सचिन भालेराव, विनोद कांबळे, पोलीस शिपाई किरण बुधवत, शंकर भांगरे, सुरज कांबळे यांचा समावेश करण्यात आला. घरफोडी गुन्हेचे अनुषगांने कोपरखैरणे, बोनकोडेगाव, घणसोली गाव, या परिसरात एकुण ८० ते ९० सीसीटीव्ही फुटेज तपासुन तसेच गोपनीय सुत्रांना कार्यान्वीत करण्यात आले.

या प्रयत्नांना यश आले व संशयित आरोपी हा बोनकोडे परिसरात असल्याची माहिती मिळाली . या माहितीच्या आधारावर सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्याने कोपरखैरणे पोलीस ठाणे परिसरात त्याचा साथीदार बबलु बंगाली याचे सह घरफोडया केल्याचे निष्पन्न झाले अटक आरोपीताकडुन ८ घरफोडी दोरीच्या गुन्हयामधील एकुण १७४ ग्रॅम ३८० मिलीग्रॅम वजनाचे सोने अंदाजे किंमत रुपये ९ लाख ५७, हजार आहे. या सह घरफोडीचे हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

आरोपी हा बबलू बंगाली याच्या सह चोरी करीत होता. चोरी केलेले सोने मज्जीद बंदर येथे वितळवून त्याचे बिस्कीट बनावट होता. जेणेकरून ओळख पटू नये. सोने वितालावाण्यासाठी बबलू हा त्याची मदत करीत होता. बबलू हा काही दिवसापूर्वी त्याच्या मूळ गावी गेला असून काही दिवसात परत येणार आहे.मात्र तो नक्की कुठे राहतो या बाबत माहिती नाही. अशी माहिती अंकुश याने पोलिसांना दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The lucky junket was unlucky for the thief and lucky for the police ysh