उरण : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे उरण ते मुंबई दरम्यानची जलसेवा शुक्रवारपासून सलग तिसऱ्या दिवशी बंद आहे. दुसरीकडे चक्रीवादळाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे आणखी किती दिवस ही जलसेवा खंडीत होणार हे निश्चित नाही.
हेही वाचा – नवी मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण
जलमार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मुंबईत ये जा करण्यासाठी रस्ते मार्गावरील भार वाढला आहे. जलसेवा ही सेवा शुक्रवारपासून बंद आहे. यामध्ये उरणच्या मोरा ते मुंबई, जेएनपीटी ते भाऊचा धक्का या मार्गावरील जलसेवा बंद करण्यात आली आहे.