Premium

एपीएमसी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास कधी होणार ? धोकादायक इमारतींच्या नोटिसा कायम

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारती वर्षानुवर्षे महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असून अद्याप पुनर्विकास नाही.

old building
एपीएमसी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास कधी होणार ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारती वर्षानुवर्षे महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असून अद्याप पुनर्विकास नाही. कांदा बटाटा मधील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादयक म्हणून घोषित करण्यात आली आहे.
शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली असून त्यांना संजीवनी मिळत आहे. मात्र एपीएमसीचा पुनर्विकास कधी होणार? असा प्रश्न बाजारघटकांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १९८२ मध्ये कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असून २००५ पासून वर्षानुवर्षे धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. बाजाराची पुनर्बांधणीचा निर्णय न्ययालयात प्रलंबित आहे. तसेच येथील इमारतींची दिवसेंदिवस परिस्थिती ढासळत आहे. बहुतांशी इमारती मोडकळीस आल्या आहेत. नुकतेच नवी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली असून कांदा बटाटा मार्केट मधील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारतीला अतिधोकादयक म्हणून नोटीस पाठविली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When will redevelopment of apmc hazardous buildings take place amy

Next Story
नवी मुंबई: वंडर्स पार्कच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी पार्क बंद, अनेकांचा हिरमोड,प्रवेशद्वारावर कसलीच सुचना नाही..