नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्कच्या नूतनीकरणानंतर १ जून पासून वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.‌ सध्या शालेय सुट्टीचे दिवस असल्यामुळे नागरिकांची आपल्या मुलांसह उत्साही गर्दी वंडर्स पार्कमध्ये बघायला मिळत आहे. पहिल्या ४ दिवसात १३ हजार ४७६ नागरिकांनी या पार्कला भेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पार्कमध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या ७ राईड्सचा आनंद नागरिकांकडून घेतला जात असून पार्कमध्ये शनिवारी ३ जूनला स्काय स्विंगर या पाळणा स्वरूपातील राइडवर अपघात घडला व ६ व्यक्तींना दुखापत झाली होती. परंतु वंडर्स पार्कचे आकर्षण नवी मुंबईकरांना असून ४ दिवसात मोठ्या संख्येने नागरिकांनी या पार्कला भेट दिली असून तिकीट विक्रीतून जवळजवळ ७ लाख ४३ हजाराहून अधिक रक्कम जमा झाली आहे. पालिका आयुक्तांनी पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी अधिक खबरदारी घेण्याचे आदेश दिलेले आहेत .तसेच शनिवारी झालेल्या घटनेची चौकशीही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त नार्वेकर यांनी दिले आहेत. दुसरीकडे या पार्कला भेट देण्यासाठी नागरिकांची ही उत्सुकता असल्याचे मागील चार दिवसाच्या गर्दीवरून पाहायला मिळत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wonders park in navi mumbai 13 thousand 476 citizens visited wonders park in 4 days zws